बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्रेया सव्वाशेरी या निराश्रित केंद्रातील निराश्रितांकरिता सतत कार्य करीत आहेत. जुने बेळगाव येथील निराश्रित केंद्रातील सदस्यांचे व्हॅक्सिनेशन झाले नव्हते. केंद्राचे प्रमुख शंकर मधली यांनी विश्वनाथ सव्वाशेरी यांना संपर्क साधून व्हॅक्सिनेशन करीता सांगितले असता श्रेया सव्वाशेरी यांनी प्रियंका उंडी ज्युनिअर हेल्थ ऑफिसर फीमेल यांच्याशी संपर्क साधून कोव्हिड-19 हॅक्सिनेशन करण्याची विनंती केली. विनंतीला मान देऊन प्रियांका यांनी मुलगी दियाचा वाढदिवसानिमित्त निराश्रित महिला केंद्र व निराश्रित पुरुष केंद्रातील सर्व सदस्यांचे बिपी, शुगर व व्हॅक्सिनेशनसह आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी वसंत पातली सिनियर हेल्थ इंस्पेक्टर तालुका हेल्प ऑफिस बेळगाव, आशा पुजारी ज्युनियर हेल्प असिस्टंट यांची साथ लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रेया सव्वाशेरी व विश्वनाथ सव्वाशेरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Check Also
हिवाळी अधिवेशनावर 580 सीसीटीव्ही तर 10 ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
Spread the love बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी …