रस्त्यावरील सीडी वर्क धोकादायक : दुरुस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष
निपाणी : शहर आणि उपनगरात वाहने आणि नागरिकांनी नेहमी गजबजलेल्या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे सीडी वर्क पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यांना लहान मोठे भगदाड पडल्याने दुचाकीस्वारालासह नागरिकांना धोका पोहोचू शकतो. पण त्याच्या दुरुस्तीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शहरवासी यातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
येथील अशोक नगरातील मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना सर्व नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. आडके प्लॉट-विद्या मंदिर मार्गावर असलेल्या सीडी वर्कला भगदाड पडले असून सदर भगदाड जीवघेणे ठरत आहे. या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. प्रशासनाला वाहनधारकांचा किंवा नागरिकांचा बळी गेल्यानंतर जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.
आडके प्लॉट-विद्या मंदिर मार्गावरून नेहमी वर्दळ असते. या मार्गावरून आडके प्लॉट, जामदार प्लॉट, विद्यानगर, भीमनगर, दर्गा गल्ली, बौद्धनगर याठिकाणी जाण्यासाठी या मार्गाचा वापर नागरिक व वाहनधारक करतात. येथील मार्गावर सीडी वर्कला सहा महिन्यापासून भगदाड पडले असून याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. येथील खड्ड्यातील सळी उघडी होण्याबरोबरच रस्त्याची चाळण झाली आहे. सदर सीडी वर्क मुख्य रस्त्यावरच असल्याने रात्रीच्यावेळी नागरिकांसाठी जीवघेणा ठरू शकते. याची दखल घेत पालिका प्रशासनाने सदर समस्या तत्काळ निकाली काढावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
भाजी मार्केटमध्ये खड्डा येथील छत्रपती शिवाजी मार्केट व चाटे मार्केट दरम्यान असलेल्या मार्गावर गटारीनजीक मोठा खड्डा पडला आहे. सदर खड्डा रस्त्याला लागूनच असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. यातून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
—
वर्दळीच्या ठिकाणी मोठा खड्डा
येथील छत्रपती शिवाजी मार्केट व चाटे मार्केट दरम्यान असलेल्या मार्गावर गटारीनजीक मोठा खड्डा पडला आहे. गटारीचे काम झाल्यावर एका बाजूला गटारीवर स्लॅब टाकला असून दुसरी बाजू उघडी आहे. त्याच्या परिसरातील नागरिक व वाहनधारकांना धोका होऊ शकतो.
Check Also
बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द
Spread the love उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …