बेळगाव (वार्ता) : बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असहाय्य अवस्थेत बसून असलेल्या एका निराधार वृद्धाला आज हेल्प फॉर नीडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आसरा मिळवून दिला.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये आज सकाळी एक निराधार वृद्ध असहाय्य अवस्थेत बसून होता. याबाबतची माहिती मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. ए. हवालदार यांनी आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी हेल्प फॉर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना दिली.
तेंव्हा आपल्या रुग्णवाहिकेसह तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय आवारात दाखल होऊन अनगोळकर यांनी त्या वृद्धाची विचारपूस केली असता. मुलगा आणि मुलीने मारबडव करून घराबाहेर काढल्यामुळे आपण निराधार झालो असल्याचे त्या वृद्धाने सांगितले.
त्या वृद्धाची व्यथा जाणून घेतल्यानंतर सुरेंद्र अनगोळकर यांनी त्याचे सांत्वन करून त्याची महापालिकेच्या निराधार केंद्रामध्ये राहण्याची सोय करून दिली. या कार्यात अनगोळकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. ए. हवालदार, आदिल मतवाले, अनिल अष्टेकर आणि मंजुनाथ लमानी यांनी सहकार्य केले.
Check Also
रुद्रण्णा आत्महत्या प्रकरण : तिन्ही आरोपी फरारी
Spread the love बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एसडीसी रुद्रण्णा यादवण्णावर यांच्या आत्महत्येप्रकरणी बेळगाव येथील …