बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील सेव्हन्टीन ट्रेकर्स बेळगाव हा पदभ्रमंती करणार्या युवकांचा समुह सालाबादप्रमाणे यंदा आयोजित किल्ले ढाकचाभैरी गोरक्षगड ते सिद्धगड माचिंद्रीगड मार्गे जीवधन गड पदभ्रमंती मोहीमेवर आज रवाना झाला.
सेव्हन्टीन ट्रेकर्सच्या पदभ्रमंती मोहीमेला बेळगाव, पुणे, कामशेत, जांभवली, कल्याण, मोरबाड, आकेफाटा, जुन्नर मार्गे घाटघर येथून सुरुवात होईल. शहरातील चव्हाट गल्ली येथील श्री मारुती मंदिरामध्ये या पदभ्रमंती मोहिमेच्या शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगाव शहराचे आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या हस्ते मंदिरातील श्री बजरंग बलीचे पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे आमदारांच्या हस्ते ट्रेकिंग अर्थात पदभ्रमंतीसाठी लागणार्या साहित्याचे पूजनही करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार बेनके यांनी व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व विशद करून पदभ्रमंतीवर निघणार्या ट्रेकर्सना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, विनायक पवार, प्रफुल्ल किल्लेकर, आनंद आपटेकर यांच्यासह चव्हाट गल्लीतील नागरिक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. सेव्हन्टीन ट्रेकर्स बेळगावचा प्रमुख श्रीनाथ पवार याच्या नेतृत्वाखाली बेळगाव, शहापूर, अनगोळ, वडगाव व येळ्ळूर येथील सुमारे 80 शिवभक्त मावळे या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झाले आहेत.
Check Also
प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार
Spread the love बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता …