बेळगाव (वार्ता) : बेळगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध दलित संघटनांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी भीमा कोरेगाव लढ्याच्या इतिहासाचे स्मरण करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही दलित नेत्यांच्या उपस्थितीत भीमा कोरेगाव विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. के. डी. मंत्रेशी यांनी 1 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार्या भीमा कोरेगाव विजयोत्सवासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. बाबासाहेब आंबेडकर हे देखील दरवर्षी भीमा कोरेगाव येथे भेट देऊन हुतात्म्यांचे स्मरण करून अभिवादन करायचे अशी माहिती के. डी. मंत्रेशी यांनी दिली.
यावेळी अशोक मन्नीकेरी, बसवराज रायव्वगोळ, पृथ्वी सिंग, मल्लेश कुरंगी, महेश कोलकार, सुधीर चौगुले, जीवन कुरणे, महादेव तळवार, अर्जुन देमट्टी, एम. आर. कलपत्री, सदा कोलकार, परशुराम वग्गन्नावर आदी उपस्थित होते.
