बेळगाव (वार्ता) : कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळ उत्तर मतदारसंघातील घोषित सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झोपडपट्टीवासीयांसाठी घोषणापत्र वितरणाचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला.
शहरात आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या हस्ते हा घोषणा पत्र वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार बेनके यांनी बेळगावातील सर्वात जुनी झोपडपट्टी असलेल्या गँगवाडी आणि रामनगर झोपडपट्टीवासीयांची फसवणूक झाली होती. मात्र आज या घोषणा पत्रांचे वाटप झाल्यामुळे झोपडपट्टीवासीयांचे सुमारे वर्षभरापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. तेंव्हा आता सर्व लाभार्थींनी आपली दाव्याची कागदपत्रे घ्यावीत आणि कोणतेही शुल्क न भरता सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन प्रथम आपल्या नांवावर जागेची नोंदणी करून घ्यावी, असे सांगितले. झोपडपट्टी भागाच्या विकासासाठी सरकार आता विविध प्रकारच्या योजना राबवून सर्वतोपरी सहकार्य करत आहे असे सांगून कांहीही समस्या उद्भवल्यास संबंधितांनी आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार बेनके यांनी केले. याप्रसंगी खासदार मंगला अंगडी झोपडपट्टी प्रदेश विकास अधिकारी लमानी, शंभूलिंगप्पा, हनुमंत कागलकर, भीमराव पात्रोट, गणेश टेडे, सुंदर लोंढे, मारुती बडसकर आदींसह बहुसंख्य लाभार्थी उपस्थित होते.
Check Also
कुस्ती वस्ताद व प्रसिद्ध पैलवान काशिराम पाटील यांचे निधन
Spread the love बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील रहिवासी, प्रसिद्ध पैलवान कुस्ती वस्ताद काशिराम कल्लाप्पा …