Saturday , December 21 2024
Breaking News

राजेंनी घेतला श्रींचा आशीर्वाद

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे माजी नगरसेवक व भाजपाचे युवानेते किर्तीकुमार संघवी यांच्या निवासस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष व कोल्हापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे यांचा वाढदिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. राजेंनी संकेश्वरकरांच्या शुभेच्छांचा स्विकार करुन निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठाला धावती भेट देऊन देवदर्शनाबरोबर मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा आर्शीवाद घेतला. यावेळी बोलताना श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, देश आज प्रगतीपथावर आहे. त्यामुळे भारतीयांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उन्नती करायला हवी आहे. आपण मेकिंग इंडिया, सौरऊर्जा प्रकल्पचे कार्य यशस्वी करणार असल्याचे सांगितले. यावेळी संतोष पाटील, विश्वजित घाटगे, नंदू मुडशी, देवदास भोसले, अजय सारापूरे, शाम यादव, किरण संघवी, विपूल संघवी, गौतम संघवी, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, अ‍ॅड. आर. एस. चौगुले, पी. डी. पाटील, गोपी हिरेमठ, संदिप अटक, अमृत माळी, रमेश माळी, रमेश मसरगुप्पी, उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत किर्तीकुमार संघवी यांनी केले. आभार विपूल संघवी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

हरगापूरगड (ता. हुक्केरी) ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

Spread the love  हुक्केरी : हरगापूरगड (ता. हुक्केरी) येथील ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *