संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर अनंतविद्यानगर डी. फार्मसी कॉलेज जवळ राहणारे मलप्पा चंद्रप्पा मलकट्टी (वय 67) यांचा विहिरीत पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला आहे. मलप्पा मलकट्टी हे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना येथील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांची अलिकडे मानसिक स्थिती बिघडल्यामुळे ते अस्वस्थ राहत होते. याच मानसिक स्थितीने ते घरातून निघून गेल्यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.
आज संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. संकेश्वर पोलीसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. मलप्पा यांच्या पश्चात पत्नी, विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
