खानापूर (वार्ता) : गणेबैल (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर 19 आणि 20 या शिवारात शुक्रवारी दि. 21 रोजी भर दुपारी ऊसाच्या फडाला आचनक आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गणबैल येथील शेतकरी मोतिराम लक्ष्मण गजपतकर, कृष्णा कल्लापा गजपतकर, मारूती मोरे, लक्ष्मण महादेव मोरे, रामचंद्र महादेव मोरे आदींचा जवळपास सहा एकर जमिनीत ऊस होता.
शुक्रवारी दि. 21 रोजी दुपारी दोन वाजता अचानक ऊसाला लागली. आगीचे कारण समजू शकले नाही.
ऊसाला आग लागताच गणेबैल गावच्या नागरिकांनी ऊसाच्या फडाकडे धाव घेतली. मात्र आगीने रूद्र अवातार घेतल्याने लागलीच खानापूर अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्यतीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
तालुक्यात अजून ऊस बराच शिल्लक आहे. त्यातच ऊसाच्या फडाला अचानक आग लागण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून भितीचे वातावरण पसरले आहे.