खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याला शहराच्या ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभारण्यासाठी सन २०१८ साली मोठी चर्चा झाली. यावेळी शहरात सरकारी जागेची समस्या निर्माण झाली. व येथील सरकारी दवाखान्याला लागुन इंदिरा कॅन्टीनच्या जागेची पर्यायी व्यवस्था झाली. व लागलीच इंदिरा कॅन्टीनच्या कामाला सुरूवात झाली. काही दिवसात इंदिरा कॅन्टीनचा पाया उभारण्यात आला. फाऊंडेशनही झाले.
२०१८ साल संपले तेव्हापासून इंदिरा कॅन्टीनचे काम अर्धवट सोडण्यात आले. ते सन २०२२ पर्यंत याकडे सरकारने ढुंकूनही पाहिले नाही. केवळ फाऊंडेशन पर्यंतचे काम करून संबंधित कंत्राटदाराने पलायन केले. तो आजपर्यंत त्याचा पत्ताही नाही. आणि इंदिरा कॅन्टीनही नाही. त्यामुळे सरकारच्या योजना सामान्यापर्यंत पोहचणार असा पश्न पडला आहे.
खानापूर शहराच्या ठिकाणी इंदिरा कॅन्टीन झाले तर गरीब कुटुंबाला स्वतात नाष्टा मिळेल दुपारच्या वेळी स्वतात जेवन मिळेल या भावनेने जनता आनंदित राहील.
आज पाच वर्षे होत आली आहेत. तरी अद्याप इंदिरा कॅन्टीनचा पत्ताच नाही.
सरकारी दवाखान्याच्या बाजुला इंदिरा कॅन्टीन होणार या आशेने दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांची सोय होईल. गरीब जनतेला स्वतात जेवन, नाष्टा मिळेल अशी होती.
परंतु गेल्या चार वर्षापूर्वी सरकारी दवाखान्याच्या बाजूला केवळ इंदिरा कॅन्टीनचे फाऊंडेशन तेवढेच उभे आहे. मात्र इंदिरा कॅन्टीन कधी उभारणार याची शाश्वती नाही.
खानापूर शहरात इंदिरा कॅन्टीन होणार आहे की केवळ खानापूर रहिवाशांचे स्वप्न राहणार अशी चर्चा खानापूर शहरात होताना दिसत आहे.
तेव्हा खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यानी इंदिरा कॅन्टीन होण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी खानापूर शहरातुन होत आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …