खानापूर (प्रतिनिधी) : पणजी -बेळगाव महामार्गावरील गणेबैजवळील टोलनाक्याजवळ दुचाकी आणि छोटा हत्ती चार चाकी वाहनांची समोरासमोर अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीचे नाव महादेव गोपाळ खाबले (वय २३) राहणार खेमेवाडी (ता. खानापूर) असुन तो बेळगांवहुन खानापूरकडे येत होता.
याचवेळी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील हे बेळगाहुन खानापूरकडे येत होते. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन अपघातात गंभीर झालेल्या युवकाला आपल्याच गाडीतुन खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचार करून लागलीच बेळगांव येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले.
बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात पुढील उपचार सुरू आहेत.
जखमी महादेव गोपाळ खांबले याच्या मागे आई, वडील, बहिणी असा परिवार आहे.
Check Also
काळ्या दिनासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जांबोटी विभागात जनजागृती
Spread the love खानापूर : 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुल भाग अन्यायाने …