Friday , October 18 2024
Breaking News

महामार्गावरील प्रकल्प रद्दचे आश्वासन

Spread the love

रयत संघटनेने साजरा केला आनंद उत्सव
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून रस्त्याचे प्राधिकरण व या ठिकाणी उड्डाणपूल करून मॉलची स्थापना करण्यात येणार होती. यामुळे शेतकऱ्यांची सुपीक यामध्ये जात असल्याने या प्रकल्पाला रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता.
रयत संघटना व प्राधिकरण अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी प्रकल्प रद्द करून याठिकाणी फक्त सहापदरीकरण रस्ता करण्यात येईल असे आश्वासन दिले. रयत संघटनेने प्रकल्पाला केलेल्या विरोधाला यश आल्याने रयत संघटना व शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणचा प्रकल्प बंद व्हावा म्हणून रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदन देणे, त्याचबरोबर आंदोलन केले होते. शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण व्हावे अशी मागणी करत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना बोलून माहिती घेतली असता शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मोठे आहे. यामुळे अनेक शेतकरी बेरोजगार होणार आहेत. या सर्व घटना अधिकारी यांच्या समोर मांडल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रकल्प रद्द करतो असे आश्वासन दिले आहे.
यावेळी बोलताना निपाणी तालुका रयत संघटना युवा अध्यक्ष बाळासाहेब हदीकर म्हणाले, रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी लढा दिला. शेतकऱ्यांनी संघटित लढा दिल्यानेच यश आले आहे. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून प्रकल्प रद्द झाला म्हणून शेतकरी वर्गाने गाफील राहू नये. भविष्यातही रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना लढत राहणार असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रयत संघटना कोगनोळी अध्यक्ष अनंता पाटील, उपाध्यक्ष मधुकर इंगवले, सेक्रेटरी राजकुमार पाटील, युवराज माने, उमेश परीट, जावेद मुल्ला, तौशिफ मुल्ला, याकूब मुल्ला, प्रकाश परीट, पुंडलिक माळी, सचिन चौगुले, अब्जल मुल्‍ला, प्रकाश वडर यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *