एलआयसीने दिला अपघाती अपंगत्वाचा लाभ : चिक्कोडी विभागातील पहिलीच घटना
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी-निपाणी एलआयसी ऑफ इंडियाचे निपाणी येथील बेळगाव नाका माळी कॉम्प्लेक्समधील एलआयसी कार्यालयाचे प्रतिनिधी आनंद संकपाळ यांचे ग्राहक एन. पी. चव्हाण यांचा मोठा अपघात झाला होता. त्यामुळे त्यांचे शारीरिक मोठे नुकसान झाले होते. अपघातानंतर चार-पाच महिने चव्हाण हे कोमामध्ये होते. शिवाय शारीरिक अपंगत्व आले. अशावेळी आनंद संपकाळ आणि चंद्रकला संकपाळ यांनी त्यांना मोठे आर्थिक मदत मिळवून दिल्याने येथील चव्हाण कुटुंबीय सावरले आहे.
एका कॉन्ट्रॅक्टरकडे एन. पी. चव्हाण हे सुपरवायझरचे काम करत होते. अचानक झालेल्या अपघातामुळे चव्हाण यांचे शारीरिक आरोग्याचे आणि कौटुंबिक आर्थिक मोठे नुकसान झाले. वयोवृद्ध आई-वडील आणि शिक्षण घेणारी लहान मुले यामुळे त्यांची पत्नी खूप भेदरुन गेली. पुढे काय करायचे? घरचा खर्च कसा भागवायचा? पतीच्या दररोजच्या औषधांचा खर्च कसा करायचा? या आर्थिक विवंचनेत असलेल्या एन. पी. चव्हाण यांच्या पत्नीला एलआयसी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आनंद संकपाळ व चंद्रकला संकपाळ यांनी खूप मोठा आर्थिक पाठिंबा मिळवून दिला. त्यामुळे या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
एन. पी. चव्हाण यांचे खासगी नोकरी व शेती आणि दुग्ध व्यवसायातून मिळणारे उत्पन्न यातील दरमहा दोन हजार बचत करण्यास आनंद संकपाळ संकपाळ यांनी चव्हाण यांना तयार केले होते. दोन वर्ष सलग बचत होत होती. मात्र चव्हाण यांचा निपाणी राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात होऊन अनेक दिवसांचा उपचार व बऱ्याच शस्त्रक्रियेनंतर चव्हाण यांना पुनर्जन्म मिळाला. मात्र त्यांना चालताना बोलताना अनेक अडचणी येऊ लागल्या. शिवाय या अपघाताने त्यांना शारीरिक अपंगत्व आले.
आनंद संकपाळ यांच्याकडे विमा पॉलिसी पाच लाख रुपयाची घेतल्यामुळे एन. पी. चव्हाण यांचे विम्याचे हप्ते दहा वर्षासाठी माफ करून पॉलिसी सुरू ठेवण्यात आली. त्याचबरोबर औषधांच्या खर्चासाठी दरमहा साडेचार हजार दहा वर्षासाठी पेन्शन सुरू करण्यात आली. तर हप्ते न भरताही विमा योजना सुरू राहिली. मुदतपूर्ण झाल्यावर मिळणारे सर्व लाभ चव्हाण यांना मिळणार आहेत. अशा प्रकारचा लाभ निपाणी आणि चिक्कोडी विभागांमध्ये एकमेव मिळवून दिल्याबद्दल आनंद संकपाळ व चंद्रकला संकपाळ यांचे चव्हाण कुटुंबीयांनी आभार मानले.
आनंद संकपाळ यांनी चव्हाण त्यांच्या गरजेनुसार योग्यवेळी योग्य विमा केल्यामुळे हे कुटुंब सावरले आहे. प्रत्येक परिवाराची योग्य जीवन सुरक्षा करणेही त्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे. कुटुंबातील कर्त्या, कमावत्या व्यक्तीला अचानक अपघात झाला तर त्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडते औषधांचा व कुटुंबाचा गाडा पुढे जाण्यासाठी आर्थिक पाठिंबा आवश्यक असतो.
असा बळकट पाठिंबा आनंद संकपाळ व चंद्रकला संकपाळ गेली वीस वर्ष निपाणी आणि परिसरातील लोकांना देत आहेत. त्यांच्या विमा सेवा कार्याला आता वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. हजारो लोकांनी त्यांच्या सेवांचा लाभ घेतला आहे. अनेक मृत्यू दावे सहज सुलभ पद्धतीने त्यांनी दिले आहेत. शिवाय गरजेच्या वेळी विमा पॉलिसीवर तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले आहे. हजारो मुला-मुलींच्या शिक्षण आणि विवाहाची सोय करून दिली आहे.
सध्या योग्य लाइफ फंड आणि कुटुंबाला नियमित उत्पन्नाची सोय मिळण्यासाठी पेन्शन नियोजन हॅप्पी लाईफ प्लॅनिंग ते ‘विमा समाधान’ या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून करून देत आहेत. आनंद व त्यांची पत्नी चंद्रकला हे दोघेही सतत आपल्या विमा ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तयार आहेत त्यांचे ध्येय ‘सतत सर्वोत्तम सेवा, सर्वांची सुरक्षा, सर्वांची समृद्धी! असेच आहे.
—–
‘ सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण तणाव वाढला आहे. शिवाय अपघातांची संख्या वाढत चालली आहे. आशा परिस्थितीत विमा उतरल्यास त्याचा उपचारही कुटुंबातील व्यक्तींना मदत मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्य विमा उतरवणे आवश्यक आहे.’
– आनंद संकपाळ, विमा प्रतिनिधी, निपाणी