Share
माणगांव (नरेश पाटील) : शहरातील कट्टर शिवसैनिक, कार्यकर्ते तथा वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले डॉ. संतोष कामेरकर यांनी माणगांव नगरपंचायतीमार्फत जो विकासकामाचा पाठपुरावा होत आहे. त्याला प्रथम प्राधान्य देऊन जनतेपर्यंत पोचवण्याचे काम पत्रकार बंधूंनी आपल्या लिखानातून करावे, असे आवाहन यावेळी केले.
माणगांव तालुका पत्रकार संघटना व इतर अनेक संस्था, मंडळ, दानसूर व्यक्ती, असोसिएशन, क्लब, फौंडेशन, आस्थापना, उपजिल्हा रुग्णालय, प्रतिष्ठान, शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून सरलादेवी मंगल कार्यलयात महारक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले याप्रसंगी डॉ. कामेरकर बोलत होते.
डॉ. कामेरकर यांनी सुरुवातीला माणगांव ता. पत्रकार संघटना तसेच इतरांचे रक्तदान शिबीर आयोजन केल्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर स्वत: आजपर्यंत 16 वेळा रक्तदान केले असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
स्वर्गीय अरुण सुर्वे यांनी खर्या अर्थाने रक्तदान शिबीर भरवत असत. मात्र त्यानंतरच्या काळात सदर उपक्रम राबवता आले नाही. परंतु माणगांव ता. पत्रकार संघटनेकडून हा समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन चांगले कार्य सुरू केले असल्याचे ते म्हणाले.
माणगांवचा विकास होण्याकारिता पत्रकार बंधूंचे सहकार्य नेहमी असणे गरजेचे आहे. पत्रकारांनी विकासकामाला प्रथम प्रधान्य देऊन प्रसिद्धी द्यावी असेही शेवटी ते म्हणाले.

Post Views:
178