खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतमधून १६३० घरे मंजुर करून तालुक्याच्या आमदारानी १० घरे प्रत्येक ग्राम पंचायतीला आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नावे घर मंजुरीसाठी दिली आहे. हा ग्राम पंचायत सदस्यावर अन्याय आहे. तेव्हा तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्याना विश्वासात घेऊन संबंधित ग्राम पंचायतीच्या पीडिओ अधिकाऱ्यानी आमदार अथवा कुणाच्या दबावाला बळी पडून घराची मंजुरी करून नये. जर ग्राम पंचायत पीडीओनी कुणालाही विश्वासात न घेता भलत्याच नागरिकांच्या नावे घरे मंजुरी केली तर यावर जाब विचारण्यात येईल व संबंधित गरिबांच्या नावे घरे होतील. यासाठी तालुका पंचायतीच्या कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना सोमवारी दि. २१ रोजी निवेदन देऊन समज दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, येत्या आठ दिवसात अशा चुकीच्या घराची यादी केली असेल तर ती यादी रद्द करावी.
ग्राम पंचायतीच्या बैठकीत गरीब व गरजू लोकांच्या नावाची यादी पीडीओनी जाहीर करावी. अन्यथा खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना, तसेच खानापूर विकास आघाडी गप्प बसणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निवेदनाचा स्विकार तालुका पंचायतीचे मॅनेजर एस. एस. सपटला यांनी करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, तालुका ग्राम पंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, लक्ष्मण तिरवीर, उदय भोसले, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, महेश गुरव, सुर्यकांत साबळे, रवी मादार, नारायण पाटील, लक्ष्मण शोंगाळे, रणजीत देसाई, रूक्माण्णा झुंजवाडकर, महाबळेश्वर पाटील, चांगापा बाचोळकर, उदय पाटील, रणजीत पाटील, बाळू बीर्जे, अमोल बेळगावकर, महिला सदस्या माया कुंभार, लक्ष्मी पाटील, रेखा गुरव, लक्ष्मी सुतार, वैशाली धबाले, सुमन कोलकार, रेणूका कांबळे, आदी ५१ ग्राम पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व नागरीक उपस्थित होते.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …