Thursday , October 24 2024
Breaking News

युवकांचे ‘दादा’ समितीच्या मुख्य प्रवाहात!

Spread the love

बेळगाव : 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी युवकांचे नेते म्हणून परिचित असलेले हिंदुत्ववादी विचारसरणीचे रमाकांत कोंडुस्कर यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट दिली.
संघटक वृत्तीचा नेता म्हणून परिचित असलेले रमाकांत कोंडुस्कर हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुख्य प्रवाहात आल्याने मराठी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
मागील 15 वर्षात म. ए. समिती विखुरली होती त्यामुळे मराठी माणसाची पर्यायाने सीमाभागाची खूप हानी झाली आहे. परंतु आता विखुरलेली मराठी जनता एकसंघ होत आहे. समितीला बळकटी येत आहे, अश्यातच रमाकांत दादांचे समितीच्या मुख्य प्रवाहात येणे म्हणजे हा तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
कार्यकर्त्यांचा नेता म्हणून परिचित असलेल्या रमाकांत दादांचा कार्यकर्त्यांचा ताफा खूप मोठा आहे. एक हाकेला शेकडो कार्यकर्ते जमविण्याची ताकद दादांकडे आहे. त्यामुळे समितीला बारा हत्तीचे बळ मिळाले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
हिंडलगा येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात येणार आहे त्यासाठी सर्वप्रथम रमाकांत कोंडुस्कर यांनी 1 लाखाची भरीव देणगी जाहीर केली आहे. दादांची समितीच्या प्रवाहात सामील होण्याची ही मुहूर्तमेढच म्हणावी लागेल. अनेक मान्यवर समितीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. सीमावासीयांमध्ये हा एक सकारात्मक संदेश दिसून येत असून खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल!

About Belgaum Varta

Check Also

रेशन वितरणात सर्व्हर डाऊनची समस्या : रेशन वितरकांनी दिले निवेदन

Spread the love  बेळगाव : रेशन वितरणाच्या नवीन सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्यात यावा, या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *