बेळगाव : 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा येथे तालुका समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक बांधण्यात येत आहे. या स्मारक उभारणीसाठी बेळगाव तालुक्यासह परिसरातील समितीप्रेमी मराठी बांधवांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर या स्मारकासाठी शिवसेनेकडूनही शक्य तितकी मदत केली जाईल असे आश्वासन अरुण दुधवाडकर यांनी दिले आहे.
1986 ला कन्नड सक्ती करण्यात आली. तेव्हापासून सीमावासीयांवर कानडी वरवंटा फिरत आहे. अनेक अन्याय, अत्याचार कर्नाटक सरकारकडून होत असतात. मागील 66 वर्षांपासून सीमाभागातील जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी झगडत आहे. पोलीस प्रशासनाची दडपशाही व अत्याचार सहन करत संविधानाच्या मार्गाने लढ्यासाठी संघर्ष करत आहेत.
युवा पिढीला सीमालढ्याचा इतिहास माहित असणे गरजेचे आहे. त्यासाठी हुतात्मा भवन उभारण्याची संकल्पना तालुका समितीने केली आहे. त्यासाठी निधी जमा करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक समितीप्रेमी दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते देणगी देऊ केली आहे. त्यामध्ये आर. एम. चौगुले (मन्नूर) 5 लाख, डी. एम. चौगुले (मन्नूर) 1 लाख, आप्पाजी मुचंडीकर (पिरनवाडी) 51 हजार, मदन बामणे 51 हजार, मनोज पावशे 51 हजार, माजी ए.पी.एम.सी. सदस्य तानाजी पाटील 1 लाख 11 हजार 117, माणिक होनगेकर 1 लाख, दीपक किल्लेकर 11 हजार, आंबेवाडी म. ए. समिती शाखा 1 लाख, कुद्रेमनी म. ए. समिती शाखा 1 लाख, रमाकांत कोंडुस्कर 1 लाख, अर्जुन जांबोटकर 21 हजार, ईश्वर गुरव (कुद्रेमनी) 11 हजार, मारुती शंकर खन्नूकर 11 हजार, गोपाळ देसाई (खानापूर) 5 हजार, मल्लाप्पा निंगाप्पा पाटील 11 हजार, एल. के. कालकुंद्री 11 हजार, डी. बी. पाटील 11 हजार, मोतेश बारदेशकर 1 हजार 5, एल. आर. मासेकर 1 हजार, कृष्णा पाटील 5 हजार 11, महेश पाटील 11 हजार, शंकर चौगुले 10 हजार आदी दानशूर व्यक्तीनी मदत देऊ केली. यामध्ये 13005 रु. रोख, 21 हजार धनादेश तर 13 लाख 50 हजार 128 रू. जाहीर करण्यात आले आहे.
