बेळगाव : बेळगावात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने बुधवारी वाहतूक सुरक्षा उपायांबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली.
बुधवारी बेळगावातील महांतेश नगरात वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयातर्फे बाईक रॅली काढण्यात आली. या विशेष कार्यक्रमात ब्रह्माकुमारी राजयोगिनी अंबिका, ११ वे जिल्हा व सत्र न्यायाधीश रमाकांत चव्हाण, डीसीपी पी. व्ही. स्नेहा, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक पी. वाय. नाईक, राजयोगिनी बी. के. प्रतिभा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ब्रह्माकुमारी विद्या यांनी सांगितले की, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे केवळ अध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे तर समाजाभिमुख कामही केले जाते. आज वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही बाईक रॅलीचा उपक्रम राबवला आहे. वाहनचालकांनी आपल्या सुरक्षेसह इतर लोकांच्या सुरक्षेचाही विचार करून वाहने चालवावीत अशी जागृती यातुन करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागातील रस्त्यांवरून ही रॅली काढण्यात येत आहे असे सांगून त्यांनी अधिक माहिती दिली.
दरम्यान, पाहुण्यांनी निशाण दाखवून रॅलीला चालना दिली. त्यानंतर महांतेशनगर पासून शहरातील विविध मार्गांवरून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी अनेक नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.
