Sunday , July 21 2024
Breaking News

राज्यस्तरीय स्पर्धेत अमन सुनगार याचे सुयश

Spread the love

बेळगाव : नेहरूनगर येथील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या अमन अभिजीत सुनगार याने अभिनंदनीय यश संपादन केले आहे.
कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या सहकार्याने एनआरजे केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च यांनी सदर राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये अमन सुनगार याने 1 सुवर्ण पदक आणि 4 कांस्य पदके पटकावली. मुलांच्या उत्कंठावर्धक 200 मी. बॅकस्ट्रोक शर्यतीमध्ये अमन सुनगार याने बसवनागुडी ॲक्वेटिक सेंटर बेंगलोरच्या यश कार्तिक आणि कुशल के. यांना अखेरच्या क्षणी मागे टाकत रोमहर्षक विजय संपादन केला. या शर्यतीचा राज्यस्तरीय विक्रम मोडीत काढण्याचा त्याचा प्रयत्न मात्र थोडक्यात हुकला.
अमोल सुनगार याने स्पर्धेत मिळविलेले यश पुढीलप्रमाणे आहे. 200 मी. बॅकस्ट्रोक सुवर्णपदक (वेळ 2 मि.19.16 सेकंद), 100 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक, 50 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक, 50 मी. बटरफ्लाय स्ट्रोक कांस्यपदक आणि 200 मी. इंडिव्हिज्युअल मिडले कांस्य पदक.
या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील विविध क्लबच्या 700 हून अधिक जलतरणपटूनी भाग घेतला होता. स्पर्धेतील यशामुळे अमन सुनगार याला भुवनेश्वर ओडीसा येथे येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेत बेळगावसह कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करणाऱ्या अमन याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, नितीश कडुचकर, अजिंक्य मेंडके व गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन, तसेच डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. विवेक सावजी, अविनाश पोतदार, माकी कपाडिया, लता कित्तूर आणि सुधीर कुसाणे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

सौंदत्तीजवळ दुचाकींचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Spread the love  उगारगोळ : हिरेकुंबीजवळ शुक्रवारी सायंकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *