Saturday , June 14 2025
Breaking News

शैक्षणिक साहित्य महागले..

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : पालकांच्या खिशाला शैक्षणिक साहित्याचे दर परवडेनासे झालेले दिसत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे पालकांना शैक्षणिक साहित्यावर फारसे पैसे खर्च करावे लागले नव्हते. यंदा मात्र पालकांना शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. वह्या (नोटबूक), कंपास, कलर बाॅक्स, टिफिन बाॅक्स, काॅलेज नोटबूक, ग्राफ बूक महागले आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य पालकांच्या खिशाला परवडेनासे झालेले दिसत आहे. शैक्षणिक साहित्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय, कष्टकरी शेतकरी लोकांची चांगलीच कुचंबणा होताना दिसत आहे. साधी २०० पानी वही एक डझनचा दर ३०० ते ६०० रुपये आहे. येथील शिवनेरी व्यापारी संकुलातील आर. आर. बूक स्टाॅलचे मालक सुधीर भोपळे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, शैक्षणिक साहित्याचे दर २० ते ३५ टक्के वाढले आहेत. आमच्या बूकस्टाॅलमध्ये गॅलक्सी, राजेश्री, पेपरिझम, लॅक्सी, राजधानी अशा अनेक कंपनीच्या वह्या नोटबुक उपलब्ध आहेत. साधी वही प्रति डझन ३०० ते ६०० रुपये, काॅलेज नोटबूक प्रति डझन ३०० ते ९०० रुपये, रफबूक १० ते २५ रुपये,कॅमल कंपास १३० ते १५० रुपये, टिफिन बाॅक्स ३० ते २०० रुपये पेन्सिल बाॅक्स १० ते ४०० रुपये, कलर बाॅक्स १० ते ३०० रुपये,बाॅलपेन ३ ते ९०० रुपये, ग्राफ बूक २० ते ५० रुपये, प्रोजेक्ट पेपर, व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड असे सर्वच शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. सर्व शैक्षणिक साहित्याचे दर २० ते ३५ टक्के वाढले आहेत. शैक्षणिक साहित्याचे दर वाढल्याने आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय कष्टकरी शेतकरी लोकांना होलसेल दरात शैक्षणिक साहित्याची विक्री करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरात तुळजाभवानी मूर्तीची उद्या प्रतिष्ठापना!

Spread the love  संकेश्वर : गोंधळी समाजातर्फे सुभाष रोड कमतनुर वेस नजीक लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *