Saturday , September 21 2024
Breaking News

‘अग्निपथ’ विरोधात निपाणीत युवकांचा आक्रोश मोर्चा

Spread the love
तगडा पोलिस बंदोबस्त : तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन
निपाणी (वार्ता) : संरक्षणासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात संरचात्मक बदल करणारी एखादी योजना आणली जात असेल तर तत्पूर्वी ती प्रायोगिक तत्वावर राबवणं गरजेचे आहे.
‘अग्निपथ योजने’त सहभागी होणाऱ्या युवकाना कुठलेही कायमस्वरूपी काम नसल्याने आणि सैनिकांना निवृत्तीनंतर मिळणारे इतर लाभ नाही. त्यामुळे निपाणी भागातील शेकडो युवकांनी शनिवारी (ता.१८) येथील धर्मवीर संभाजी चौकामधून आक्रोश मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवून निषेध नोंदविला. यावेळी काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या मिरवणुकीत विविध प्रकारच्या घोषणा दिल्याने परिसरात दणाणून गेला. यावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
सैनिकी निष्ठा चार वर्षात निर्माण होतील का? ६ महिने प्रशिक्षण दिलेला युवक फिल्डवर पूर्ण क्षमतेने लढू शकेल का? पुरेसा अनुभव नसेल आणि अपूर्ण प्रशिक्षण यामुळे फिल्डवर लढताना या युवकांच्या जीवाला अधिक धोका तर निर्माण होणार नाही ना? असे अनेक प्रश्न युवकांनी व्यक्त केल्या. चार वर्ष सेवेच्या काळात शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून लांब राहिलेल्या युवकांना चार वर्षानंतर काय संधी असतील याबद्दल कुठलीही स्पष्टता या योजनेत नाही. युवकांना रोजगार मिळेल असे केंद्र सरकार सांगत असले तरी या योजनेतील रोजगार म्हणजे केवळ आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही  योजना तात्काळ रद्द करावी. उमेदवार भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राबवावी, यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
आमदार काकासाहेब पाटील यांनी, नव्या योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबियांची पिळवणूक होणार आहे. शिवाय शेतकरी आणि जवानावर अन्याय होत आहे. मोदी सरकार हे भारतीय सैनिकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य आवरला अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
लक्ष्मण चिंगळे यांनी, केंद्र सरकार युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे समाजव्यवस्था विस्कळीत होत आहे. कांबळे अग्नीपथ योजना केंद्र सरकारने रद्द करावी. पुढील प्रमाणे सैन्यभरती करून सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी, युवकांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. सोमवारी (ता.२०) बेळगाव येथे हे आंदोलन करण्यात येणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, साक्षी विश्वनाथ पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
माजी आमदार काकासाहेब पाटील आणि युवतींच्या हस्ते तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना निवेदन देण्यात आले.
 यावेळी निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक दीपक सावंत, शौकत मणेर, दत्ता नाईक, अनिस मुल्ला, नवनाथ चव्हाण, निकु पाटील, अवधूत गुरव, अमित शिंदे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

About Belgaum Varta

Check Also

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

Spread the love  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *