निपाणी (वार्ता) : स्वांतत्र्यपुर्व काळापासूनची निपाणी रेल्वे मागणी अमृत महोत्सवी स्वतंत्र भारतात पूर्ण होण्यासाठी बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आजी, माजी संसद सदस्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी केली आहे.
सध्या बेळगांव, हुक्केरी, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर या मार्गावरील सुरू असलेल्या रेल्वे लाईन सर्वेक्षणकडे जातीने लक्ष द्यावे. तत्कालीन माजी रेल्वे मंत्री नामदार लालबहाद्दूर शास्त्रींनी निपाणी रेल्वे मार्ग बाबतीत दिलेले आश्वासन पुर्ण करणेची संधी सोडु नये.
या मार्गावरील रेल्वे लाईनमुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील दोन जिल्हेच नव्हे तर दोन राज्ये जोडली जाऊन दोन्ही राज्यातील औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात विकास होणार आहे.
या मार्गावरील अंतर कमी झाल्याने इंधन, वेळ, पैसा वाचणार आहे. तेव्हा या मार्गावरील रेल्वे लाईन कार्यान्वीत होण्यासाठी सर्वच पक्षांच्या आजी माजी खासदार आमदार यांनी प्रयत्न करावेत. याबाबतीत कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने, राज्यसभा सदस्य धनंजय महाडीक बेळगांव जिल्ह्यातील खासदार जगदीश शेट्टर, चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रियांकाताई जारकीहोळी यांना निपाणी रेल्वे समितीतर्फे प्रा. राजन चिकोडे यांनी ईमेल द्वारे विनंती पत्र पाठविलेले आहे.
एकदम मस्तच योजना आहे कि आसे झालेतर प्रवाशाच्या प्रवासाचा वेळ तसेच रोडवरील वहानांनचेहि ओझे कमी हो ईल हे महत्वाच.
वंदेमातरम।