Friday , November 6 2026
Breaking News

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड

Spread the love

 

 

खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील हिची कुस्ती या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत श्रावणीने 61 किलो वजन गटात तालुक्यात आपले प्रावीण सिद्ध केले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत तिने प्रथम फेरीत 10-0 व उपांत्य फेरीत उपांत्य फेरीत 10- 2 अशा गुणाने प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी ठरली व राज्य क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. कुमारी श्रावणी कुसमळी येथील युवा कार्यकर्ते भरामानी पाटील यांची करण्यास कन्या असून तिने थाळीफेक व गोळा फेक क्रीडा प्रकारात सुद्धा स्वतःचे प्राविण्य सिद्ध केले आहे. ती जांबोटी माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असून तिला कुस्ती प्रशिक्षक श्री. सुनील ठाणब यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक महेश सडेकर व इतर शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले आहे.
जाबोटी कणकुंबी परिसरातून कुस्ती क्रीडा प्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारनारी कुमारी श्रावणी पहिली विद्यार्थिनी आहे त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ओलमणीतील म्हैस चोरीचा छडा; तीन आरोपी अटकेत

Spread the love  १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी हस्तगत; शेतकऱ्याला दिलासा खानापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *