Saturday , September 21 2024
Breaking News

शहापूरच्या मुक्तीधाम स्मशानभूमीतील पत्रे धोकादायक स्थितीत, मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष

Spread the love

बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरात विविध विकास कामे केली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील स्मशानभूमीच्या सुधारणांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी देत असतात. प्रत्यक्षात सदाशिवनगर स्मशानभूमी वगळता शहरातील अन्य स्मशानभूमीच्या सुधारणेकडे महापालिकेने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून उपनगर परिसरातील महत्त्वाची शहापूर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱ्यावरील निवार्‍याचे पत्रे खराब झाले आहेत. खराब झालेल्या पत्र्यांमुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी आमदार अभय पाटील यांच्या समवेत आलेले मनपा आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना माहिती देण्यात आली होती. आमदार अभय पाटील यांनी शहापूर स्मशानभूमीच्या समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी निवारा वरील पत्रे बदलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या आश्वासनाकडे अधिकाऱ्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
यापूर्वीही कोरोना काळात निवार्‍या वरील पत्रे खराब झाले होते.त्यावेळीही स्मशानभूमी सुधारणा कामात कार्यरत असलेल्या मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने बेळगाव महापालिकेला माहिती देण्यात आली होती. नागरिकांच्या जिवाला धोका असतानाही त्यावेळीही महापालिकेने पत्रे नवे घालण्यात दुर्लक्ष केले होते. खराब झालेले तब्बल 40 पत्रे हैबत्ती कुटुंबीयांच्या मदतीने अंत्यविधी चौथर्‍याच्या निवाऱ्यावर घालण्यात आले होते. यावेळीही निवार्‍या वरील पत्रे खराब झाले आहेत.खराब झालेल्या पत्र्यांमुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला आहे. याची गंभीर दखल घेऊन, आमदार अभय पाटील यांनी शहापूर स्मशानभूमीतील खराब झालेले पत्रे तात्काळ नवे बसविण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी; सहा जणांना 20 वर्षांची कठीण शिक्षा

Spread the love  बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *