Saturday , September 21 2024
Breaking News

स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर संपन्न

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाविषय मार्गदर्शन शिबीर नुकताच पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन जयंत तिनेईकर होते. तर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षण प्रेमी उद्योजक शंकर खासनीस होते. यावेळी संस्थेचे सचिव अ‍ॅड. चेतन मणेरीकर, अ‍ॅड. मदन देशपांडे, सदानंद कपिलेश्वरी, पंकज खासनीस, प्रशांत खासनीस, प्राचार्या श्रध्दा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्या श्रध्दा पाटील यांनी केले. तर प्रमुख वक्त्यांचा परिचय सचिव अ‍ॅड. चेतन मणेरीकर यांनी करून दिला.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख वक्ते शंकर खासनीस म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वेळेला अधिक महत्व द्यावे. घडाळ्याच्या काट्याप्रमाणे वेळेत अभ्यास केला तर तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. आजच्या आधुनिक विज्ञान युगात वेळेला जास्त महत्व द्यावा.
अभ्यासासाठी अनेक साधने आली आहेत. त्यामुळे सखोल अभ्यास करण्यासाठी मोबाईलव्दारे वेगवेगळ्या अ‍ॅपचा वापर करून अभ्यास करण्यास खूप मदच होईल मोबाईल हा चांगल्या अभ्यासासाठी वापरा तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. त्यामुळे अलिकडच्या काळात अभ्यासासाठी अनेकसाधने उपलब्ध झाली आहेत. अभ्यासासाठी कोणतीच आडचण नाही. जो विद्यार्थी हुशार आहे. तो नक्कीच चमकणार, तेव्हा विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क घेऊन सीईटी, नीट सारख्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवा. आणि शाळेचे नाव, आईवडीलांचे नाव उज्वल करा, असे अवाहन केले.
यावेळी सचिव अ‍ॅड. चेतन मणेरीकर यानी विद्यार्थ्यांनी दुरदृष्टीकोन ठेवून आतापासूनच अभ्यासाची तयारी ठेवा. पुढील शिक्षणासाठीचा मार्ग सुलभ जाईल असे सांगितले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपले विचार मांडले.
शेवटी शाळेचे प्रशासक दिपक सखदेव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Spread the love  खानापूर : शाळा ही आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि भविष्याची वाट दाखविणारी असते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *