बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सरस्वती वाचनालय, बेळगाव येथे रविवारी (ता.२२) सकाळी ९.३० वाजता विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी राणी चन्नमा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनिषा नेसरकर व राणी पार्वतीदेवी महाविद्यालयातील प्रा. महादेव खोत यांची ‘मराठी भाषा व रोजगाराच्या संधी’ या विषयावर व्याख्याने होतील व विविध विषयांवर चर्चाही होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी चन्नमा विद्यापीठाच्या मराठी विभागातील माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद गायकवाड हे असतील. कार्यक्रम सर्वांना खुला आहे. इच्छुक नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरुपा इनामदार यांनी केले आहे.