अध्यक्ष रवींद्र शिंदे; २६ वी वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून सभासद, कर्जदार, ठेवीदारांचे हित जोपासले आहे. संस्थेचा कर्जपुरवठा मर्यादित असला तरी तो भक्कम आहे. संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे यांच्या नावे स्वमालकीची बहुमजली इमारत बांधण्यात येत आहे. वेळेवर कर्ज पुरवठा व वसुली योग्य प्रकारे झाल्याने संस्थेला आर्थिक वर्षात ५४ लाख ८६ हजारावर निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक रवींद्र शिंदे यांनी दिली. येथील धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेची २६ वी वार्षिक सभा शनिवारी (ता.२१) झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष दिवंगत विश्वासराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे सेक्रेटरी अनिल भोसले यांनी, संस्थेचे ३० लाख ५३ हजारावर भाग भांडवल, ३ कोटी ६८ लाखावर राखीव व इतर निधी, १६ कोटी ६० लाख ९९ हजारावर ठेवी, १० कोटी ३६ लाख ४८ हजारावर गुंतवणूक, ११ कोटी २५ लाखावर कर्ज वितरण करून अहवाल सालात ५४ लाख ८६ हजारावर नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना २५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी गोपाळ नाईक, विठ्ठल वाघमोडे, झुंजार दबडे, राजेश शेडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेस उपाध्यक्ष मधुकर खवरे, गजानन शिंदे, संचालक सुनील वाडकर, महेंद्र सांगावकर, सुनील काळगे, अनिल सांगावकर, सुभाष कुकडे, राहुल शिंदे, विजय साळोखे, परशराम कांबळे, संजय चोरगे, दीपक सांगावंकर, आकाश संगावकर, सुभाष कांबळे, मुकुंद रावण, ओंकार शिंदे, पप्पू शिंदे, रणजीत भोसले, शिवाजी पठाडे, दिलीप शिंदे यांच्यासह ठेवीदार सभासद व कर्मचारी उपस्थित होते. सुनील काळगे यांनी स्वागत केले. नितीन साळुंखे यांनी सूत्रसंचालन तर सतीश येडुरे यांनी आभार मानले.