Saturday , September 21 2024
Breaking News

निपाणीत आज पोलिस ठाणे इमारतींचे उद्घाटन

Spread the love

गृहमंत्र्यांची उपस्थिती : प्रशासनाकडून तयारी पूर्ण

निपाणी (वार्ता) : येथील मंडल पोलिस निरीक्षक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शहर व ग्रामीण या दोन पोलिस ठाण्यांच्या नूतन सर्व सोयींनी युक्त इमारतींचे बांधकाम आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. या इमारतींचे उद्घाटन गुरूवारी (ता. ७) सकाळी १० वाजता धर्मादाय खात्याचा मंत्री शशिकला जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अरगज्ञानेंद्र, पालकमंत्री गोविंद कारजोळ, आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, कर्नाटक सरकारचे उपसभाध्यक्ष विश्वनाथ मामनी, महेश कुमठळ्ळी, अभिवृद्धी निगमचे दुर्योधन ऐहोळे, कर्नाटक तांडा अभिवृद्धी अध्यक्ष पी. राजीव यांच्यासह जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे तयारी केली आहे.
या इमारतींसाठी मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य सरकारने ४ कोटींचा निधी मंजूर केला. यापैकी २ कोटी ७० लाख रुपये खर्चून शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजता या दोन पोलिस ठाण्यांच्या इमारतीचे उद्घाटन गृहमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रवीण सुद, जी. अरुण चक्रवर्ती, अम्लीन आदित्य बिश्वास, नितेश पाटील, दर्शन एच. व्ही. बी.एस. बसवराज, एन. सतीशकुमार, डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, एन. बी. गोडय्या, खासदार अनंतकुमार हेगडे, अण्णासाहेब जोल्ले, इरान्ना कडाडी,मंगल अंगडी, सतीश जारकीहोळी, रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी, गणेश हुक्केरी, हनुमंत निराणी, श्रीमंत पाटील, अनिल बेनके, अभय पाटील, लक्ष्मी हेब्बाळकर, अंजली निंबाळकर, महांतेश दोड्डगौडर, महांतेश कौजलगी, लक्ष्मण सवदी, महादेवाप्पा यादवाड, डॉ. तलवार साबण्णा, चनकनराज हट्टीहोळी, लखन जारकीहोळी, प्रकाश हुक्केरी, नगराध्यक्ष जयवंत भाटले, मुक्तार पठाण, डॉ. विश्वनाथ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्या

Spread the love  डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उ‌द्घाटन निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *