खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात येणार्या खानापूर-हेमाडगा गोवा महामार्गावरील हलात्री नदीच्या पुलावर गुरूवारी सकाळपासून पाणी आल्याने खानापूर पोलिसांनी खबरदारी म्हणून खानापूर-हेमाडगा गोवा रोडवरील हलात्री नदीच्या पुलावरील वाहतुक बॅरिकेट लावून थांबविली आहे.
गेल्या आठवड्यापासून खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील नद्या, नाले, तलाव, दुथडी भरून वाहत आहेत.
गुरूवारी दि. 14 रोजी पावसाचा जोर वाढल्याने नेहमीच चर्चेत असलेल्या हलात्री नदीच्या पुलावर पाणी आल्याने खानापूर शहराशी संपर्क तुटला आहे. यावेळी कोणीही हलात्री नदीचे पात्र ओलांडून जाऊ नये यासाठी खानापूर पोलिसांनी बॅरिकेट लावून होणारा धोका टाळला.
सकाळपासूनच खानापूर पोलिसांनी हलात्री नदीच्या काठावर तळ ठोकून बंदोबस्त करत आहेत.
त्यामुळे येथून कोणतीच वाहतुक गोवा मार्गे सुरू करण्यात आली नाही. कोणीही हलात्री नदीचे पात्र ओलंडण्याचे धाडस करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
गेल्या 24 तासात खानापूर तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद मि.मि. पुढील प्रमाणे आहे.
कणकुंबी येथे सर्वात जास्त पावसाची नोंद 152.4 मिली मिटर अशी केली आहे. तर खानापूर : 41.2 मिली मिटर, नागरगाळी : 67.2 मिली मिटर, बिडी : 37.4 मिली मिटर, कक्केरी: 55.4 मिली मिटर, असोगा : 47.6 मिली मिटर, गुंजी : 66 मिली मिटर, लोंढा रेल्वे : 91 मिली मिटर, लोंढा पीडब्लूडी : 90.2 मिली मिटर, जांबोटी : 91 . 8 मिली मिटर, कणकुंबी : 152.4 मिली मिटर सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …