खानापूर : खानापूर तालुका हा अति पाऊसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातच अति जंगलाने वेढलेला तालुका आहे.
अशा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठवड्यापासुन धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील कबनाळी गावात जुन्या व मातीच्या घराची भिंत कोसळून राजू महाजिक या गरीब शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले.
मात्र सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.
सदर घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली.
यावेळी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष व तालुका ग्राम पंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी ही घटना स्थळी भेट दिली.
खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. खेडोपाडी घरे कोसळून गरीब शेतकऱ्यांचे लोखो रूपयाचे नुकसान होत आहे.
याकडे संबधीत खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करावे.
खानापूर तालुक्याच्या दंडाधिकारी प्रविण जैन यांनी दुर्घटनाग्रस्ताना लागलीच परिहार देऊन त्यांना सहकार्य करावे. त्याच्या संसाराला मदत करावी. अशी तालुक्याच्या जनतेतून होताना दिसत आहे.
खानापूर तालुक्यात गेल्या २४ तासात झालेल्या मुसळधार पावसाची नोंद मिली मिटर पुढील प्रमाणे झाली असुन जांबेटी येथे सर्वात जास्त ११९.२ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. तर खानापूर : ६१.४ मिली मिटर, नागरगाळी : ३३.६ मिली मिटर, बिडी : २२.४ , कक्केरी : ३१.४ मिली मिटर, असोगा ९३ मिली मिटर, गुंजी : ६८.२ मिली मिटर, लोंढा रेल्वे : ८३ मिली मिटर, लोंढा पीडब्लूडी : ९७ मिली मिटर, कणकुंबी : ९३ मिली मिटर, तर सर्वात जास्त पावसाची नोंद जांबोटी : ११९ मिली मिटर अशी झाली आहे.
Check Also
घोटगाळी-रंजनकुडी मार्गावर हत्तीचे दर्शन
Spread the love खानापूर : खानापूर तालुक्यातील घोटगाळी-रंजनकुडी मार्गावर नागरिकांना हत्तीचे दर्शन झाले असून थोड्या …