सौंदलगा : येथील पीएलडी बँकेचे अध्यक्ष, निपाणी एस. एस. ढवणे (सर) यांचा 64 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध 30 रोपे सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या सरकारी जागेमध्ये लावण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, प्राथमिक सरकारी मराठी मुलांच्या व मुलींच्या शाळेमध्ये फळे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर क्रांतिवीर संगोळी रायण्णा सो. सहाय्यक संघ यांच्या वतीने कन्नड व मराठी शाळेमध्ये 300 वह्यांचे वाटप करण्यात आले.
कन्नड शाळेतील एसडीएमसी सदस्यांच्या वतीने कन्नड शाळेतील 20 खेळाडू विद्यार्थ्यांना निकॅप वाटप करण्यात आले. तसेच सर्वांनी एस. एस. ढवणे (सर) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गणपती कोठवाळे, संभाजी पाटील, संभाजी साळुंखे, माजी ता. पं. सदस्य अप्पासाहेब ढवणे, दिलीप आडसुळ, अनिल शेवाळे, एस.के.भानसे, दादासाहेब कोगनोळे, सुरेश भानसे, खाणू बोरगुंडे, नामदेव माने, डॉ. संदीप गोरंबे, सर्जेराव साळुंखे, इंद्रजीत पाटील, कृष्णात शेवाळे, संजय पाटील तसेच ढवणे प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.