Sunday , July 26 2026
Breaking News

हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाचा शेतकऱ्यांना धक्का

Spread the love

 

बेळगाव : हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाने शेतकऱ्यांचा एक दावा मंगळवारी (दि. ३) फेटाळला. त्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला असून, या निकालाविरोधात महिनाभरात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमोरील एक अडथळा दूर झाल्यामुळे बायपास कामाचा वेग वाढणार आहे.

हलगा-मच्छे बायपासचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय या रस्त्यावरून कोणतीही रहदारी करण्यात येऊ नये, रस्ता वापरण्यात येऊ नये, असा दावा शेतकऱ्यांनी सातवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. या दाव्यावर आज अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांचा हा दावा फेटाळून लावला. दावा फेटाळताना कोणती कारणे दिली आहेत, याबाबत अद्याप सविस्तर माहिती वकिलांना मिळालेली नाही; पण महिनाभराच्या आत या निकालाविरोधात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *