खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदी घाटावरील ड्रेनेज पाईप फुटून नदीच्या पाण्यात मिसळत आहे. याचा परिणाम शहरावासीयाच्या आरोग्याला तसेच मलप्रभा नदीवर येणाऱ्या भाविकांना स्नान केल्याने त्रास होत आहे.
या शिवाय गटारीचे दुषित पाणी मलप्रभा नदीत मिसळत असल्याने कुप्पटगिरी, जळगे, करंबळ, पारिश्वाडसह बैलहोंगल तालुक्यातील गावाना या दुषित पाण्याचा त्रास सहन करावा लागतो.
याची दखल खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेने घेऊन मलप्रभा नदीच्या घाटावर ड्रेनेज पाईप फुटून दुषित पाणी मिसळत असलेल्या ठिकाणी भेट देऊन समस्या मांडल्या.
यावेळी बोलताना खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले की, खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील दुषित पाणी मलप्रभा नदीच्या पाण्यात मिसळत आहे. याची नगरपंचायतीकडुन दखल घेणे गरजेचे आहे. मात्र याकडे म्हणावे तसे गांभिर्याने नगरपंचायत लक्ष देत नाही.
याचा परिणाम मलप्रभा नदीवर आमांवशा,सनाच्या दिवशी स्नानासाठी येतात. अशा दुषित पाण्यात स्नान केल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागतो. या मलप्रभा नदीचे दुषित पाणी शहरातील हाॅटेलमध्ये वापरले जाते. शहरात येणाऱ्या नागरीकांना हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे आरोग्याला धोका संभवतो. हा धोका टाळण्यासाठी नगरपंचायतीने दुषीत पाण्याचा बंदोबस्त करावा. अन्यथा खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटना यावर आवाज उठविणार असल्याचे सांगितले.
यावेळी खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, सदस्य उदय भोसले, चांगाप्पा बाचोळकर, नारायण पाटील, लक्ष्मण तिरवीर, सावित्री मादार, जयश्री कोलकार, संजय पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.