बेळगाव : सर्वसामान्य जनतेला वेळेत पत पुरवठा करुन त्याचे जीवनमान उचवणारी सहकारात वेगळे स्थान निर्माण करणारी संस्था म्हणजे नवहिंद सोसायटी, असे गौरवोदगार नवहिंद को ऑप. क्रेडिट सोसायटी लि, येळ्ळूर आतरराज्य या संस्थेतर्फे सन 2023 सालासाठी मुद्रित केलेली दिनदर्शिका प्रकाशन करताना दि. बेळगाव पायोनियर अर्बन को ऑप. बॅंकेचे चेअरमन मा. श्री. प्रदिप अष्टेकर यांनी काढले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी चेअरमन उदय जाधव होते.
नवहिंद दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दत्त मंदिर वडगांव येथील कार्पोरेट कार्यालयाच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख्य अतिथी म्हणून मराठा बँकचे चेअरमन मा. श्री. दिगंबर पवार यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल गौरवोदगार काढले. संस्था स्थापनेपासून विविध उपक्रम राबून नवहिंदने सहकारात मोठे यश संपादन केल्याचे सांगितले. तसेच अनंत लाड यांनी शुभेच्छापर भाषण केले.
यावेळी उदय जाधव यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले व बोलताना आपल्या प्रस्ताविकात सांगितले की, सहकाराचे कार्य सतत सुरु ठेवले पाहिजे, त्यामध्ये वैविधत असली पाहिजे, त्यासह ग्राहकांशी संवाद साधला पाहिजे, नवहिंद पतसंस्थेने सहकाराच्या माध्यमातून अनेक परिवाराला आर्थिक पाठबळ देवून त्यांचे जिवनमान सुधारले आहे. समाजाच्या उपयोगातील अनेक योजना संस्थेमार्फेत सुरु ठेवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सभासदाना 2023 सालाची दिनदर्शिका देण्यात आली.
श्री. दिगबंर पवार व श्री. प्रदिप अष्टेकर यांच्या हस्ते नवहिंद दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन करण्यात आले. आरंभी श्री. दिगबंर पवार व श्री. प्रदिप अष्टेकर, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अनिल हुंदरे यांनी केले. माजी संचालक आनंद पाटील यांनी गणेश वंदना सादर केली. शेवटी संचालक प्रकाश अष्टेकर यांनी आभार मानले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन संभाजी कणबरकर, संचालक पी. एस. मुरकुटे, सी. बी. पाटील, श्री. बी. आर. पुण्यान्नावर, संचालिका एस. वाय. चौगुले, सौ. निता जाधव, न्यू नवहिंद मल्टीपर्पजचे चेअरमन दशरथ पाटील, व्हा. चेअरमन नारायण जाधव, नवहिंद प्रियदर्शिनी महिला पतसंस्थेच्या चेअरपर्सन सौ. माधूरी पाटील, व्हा. चेअरपर्सन सुरेखा सायनेकर, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या अध्यक्षा सौ. शुभांगी पाटील विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते, बेळगाव प्रेस ओनस असोसिशनचे अध्यक्ष श्री. श्रीधर जाधव, सभासद, असि. जनरल मॅनेजर एन. डी. वेर्णेकर, वसूली अधिकारी जे. एस. नांदूरकर, शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.