Friday , April 25 2025
Breaking News

सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडीला बसत आहेत; संजय राऊत

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकात दोन्ही भाजपचे सरकार आहे, त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मधस्थी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत असून अमित शहांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाष्य केले.
संजय राऊत म्हणाले, अमित शाह यांना भेटून काही फायदा नाही, असे बोम्मई म्हणत आहेत, पण आम्ही म्हणतो, अमित शाहांना भेटून फायदा आहे. कारण सीमाभाग केंद्रशासित करण्याचा निर्णय झाल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय घेत असते. सीमाभागात धुडगूस सुरु असून त्याठिकाणी राज्यातील फौजफाटा काढून केंद्रीय फौजफाटा तैनात केला आहे. मराठी भाषिक अल्पसंख्याक आयोगाखाली येतो, त्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार गृहमंत्र्यांना आहे. सीमाभागातील मराठी भागावर अन्याय होतोय, चिरडलं जातंय, भरडलं जात आहे.

संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत, सीमाभागाचे सर्वाधिक चटके त्यांची सासूरवाडी असलेल्या कोल्हापूरला बसतात. सगळ्यात मोठा संघर्ष कोल्हापुरात होतो, त्यामुळे या प्रकरणात सर्वात जास्त माहिती त्यांना आहे. राऊत पुढे म्हणाले की, न्यायायलयात अनेक प्रकरणे आहेत म्हणून केंद्राने सीमाभागात हस्तक्षेप करायचा नाही का?संसदेनं बोलायचं नाही का? न्यायालय राम मंदिराची सलग सुनावणी करून प्रश्न सोडवू शकतो, पण 20 ते 25 लाख मराठी भाषिकांच्या प्रश्नावर मात्र तारखेवर तारीख मिळत आहे.

सरकारच्या इंटरेस्टचे विषय न्यायालयात सुटतात, पण सीमाभाग असेल, राज्यातील बेकायदेशीर सरकार असेल, त्याला तारखा पडताहेत. म्हणून लोकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीतून काही चांगल निघणार असेल, तर आम्ही स्वागत करतो, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट

Spread the love  कोल्हापूर : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *