Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर म. ए. समिती तात्पुरती स्थगित, बरखास्त नव्हे!

Spread the love

 

खानापूर : 2018 पासून खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे दोन गट कार्यरत होते. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मध्यवर्तीच्या नेतृत्वाखाली ऍड. राजाभाऊ पाटील, प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, ऍड. एम. जी पाटील यांच्या उपस्थितीत विखुरलेल्या दोन्ही गटात 9 नोव्हेंबर रोजी खानापूर समितीत एकी घडवून आणली होती. त्यावेळी खानापूर म. ए. समिती तात्पुरती स्थगित करण्यात आली होती व तालुक्यातील आठ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती व या समितीवर खानापूर तालुक्याचा दौरा करून कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र काही वृत्तपत्रांमध्ये खानापूर म. ए. समिती बरखास्त करण्यात असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते, असे गोपाळ देसाई यांचे म्हणणे आहे. मात्र खानापूर समिती तात्पुरती स्थगित केली आहे बरखास्त केलेली नाही, असे मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी काल झालेल्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *