बेळगाव : कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना सीमाभागात प्रवेशबंदी केली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार हे गनिमी कावा करत बेळगावात काल मंगळवारी सकाळी दाखल झाले. येळ्ळूर येथील भेटीदरम्यान त्यांनी वडगाव येथील समिती कार्यकर्त्यांची भेट घेतली व संवाद साधला व येथील मराठी जनतेच्या भावना समजून घेतल्या.
यावेळी समिती कार्यकर्ते उमेश पाटील, महेश जुवेकर, शिवानी पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.