खानापूर : दि. 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज बुधवार दि. 14 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. तरी समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या आठ सदस्यीय कमितीतर्फे करण्यात आले आहे.