चीफ ऑफिससरानी केली कारवाई
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीची सोमवारी दि. १२ रोजी मासिक बैठक पार पडली.
या बैठकीत नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी खानापूर शहरातील अनेक दुकान व हाॅटेल मालकांनी टॅक्स भरला नाही. अशा दुकान व हाॅटेल मालकाना नोटीसा देऊन देऊन सुचना करा. अन्यथा सील ठोका. नाहीतर नगरपंचायतीच्या उत्पनात वाढ दिसून येणार नाही. त्यामुळे शहरातील विकासकामांना खिळ बसली आहे. असे सांगताच
नगरपंचायतीकडून शहरातील व दुकान व हाॅटेल मालकाकडून टॅक्स गोळा करण्याची मोहिम नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर, आर. के. वटार, तसेच सायनेटरी इन्स्पेक्टर एस. आर. पाटील व प्रेमानंद नाईक यादीनी खानापूर शहरात फिरून ज्या हाॅटेल दुकान मालकाकडून टॅक्स आला नाही अशा दुकान व हाॅटेल मालकाना नोटीस देण्यास शुक्रवारी दि. १७ रोजी सुरूवात करण्यात आली.
यावेळी बोलताना चीफ ऑफिसर आर. के. वटार म्हणाले की, खानापूर शहरात जवळपास ६५० हुन अधिक दुकाने व लहान मोठी हाॅटेल आहेत. काही दुकान व हाॅटेल मालकानी टॅक्स भरला नाही. अशा जवळपास ५३० हुन अधिक हाॅटेल लायन्स देण्यात आली तर १४० जणांनी लायन्सस घेतली नाही. याशिवाय लायन्सस रिलिव्हर घेण्याची सूचना करण्यात आली आहे. जर टॅक्स भरला नाही तर हाॅटेल सील करण्याचा आदेश देण्यात आला आहे. प्रत्येक दिवशी २० दुकान व हाॅटेल मालकाना नोटीसा देत आहोत. आता तरी हाॅटेल मालकाना याची दखल घेऊन टॅक्स भरावा. लायसन्स रिलिव्हर करून घ्या
अन्यथा हाॅटेल सील करण्याची वेळ येईल असे सांगितले.