खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने खानापूर नगरपंचायतीचे नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, अर्बन बॅंकेचे चेअरमन अमृत शेलार, बॅंकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, म. ए. समितीचे नेते यशवंतराव बिर्जे, ऍड. केशव कळेकर, नगरसेवक विनोद पाटील, आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विलासराव बेळगांवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
तर दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या वतीने नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना विलासराव बेळगांवकर म्हणाले की, जांबोटीसारख्या अतिमागसलेल्या व जंगल भागात सोसायटी उभारून अनेक गरीब कुटुंबाना आर्थिक सहाय्य करून संसारिक अडचणी दूर केल्या, तसेच सामाजिक कार्य ओळखून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. एवढेच नव्हे तर भजनी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करून समाज कार्य केले. आज दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीला ३० वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकमेव जुनी सोसायटी म्हणून ओळखली जाते.
यावेळी कार्यक्रमाला संचालक विद्याधर बनोशी, यशवंतराव पाटील, खाचापा काजुनेकर, मारूती मादार, मॅनेजर डी. एस. हुन्नरकर आदी उपस्थित होते.
आभार मॅनेजर डी. एस. हन्नूरकर यांनी मानले.