बेळगाव : ऍड. नागेश सातेरी अमृतमहोत्सव सत्कार सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. पण बेळगांव शहरातील सध्याची तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन सत्कार सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय सत्कार सोहळा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे अध्यक्षस्थानी होते.
समारंभाची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.