Monday , September 21 2026
Breaking News

भाग्यनगर येथे भीषण अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : भाग्यनगर १० व्या क्रॉसनजीक मालवाहू टिप्परची धडक बसून शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. आज शुक्रवारी सायंकाळी ५ वा. सुमारास हा अपघात घडला.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना टिप्परने या विद्यार्थ्याला जोराची धडक दिली. या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रदीप शिंदे वय १२ रा. रोहिदास कॉलनी चौथा रेल्वे गेट अनगोळ बेळगाव असे मयत विद्यार्थ्यांचे नाव असून तो शानभाग शाळेत शिकत होता.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची वाहतूक दक्षिण पोलीस स्थानकात नोंद झाली असून संबंधित टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *