निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. याबाबत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी आडी, शिवापुरवाडी, गजबरवाडी येथे जनजागृती केली.
पोवार म्हणाले, ऊसाला प्रति टन साडेपाच हजार रुपये मिळावा, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई तात्काळ देण्यात यावी, घरे पडलेल्या शेतकऱ्यांना घरकुल मंजूर करावे, यासह विविध मागण्यासाठी आंदोलन करणार आहोत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना अधिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आम्हाला पुढील निष्कर्षाची खात्री आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे कृषी ऊसाला एफआरपी दराऐवजी एसएपी लागू केली पाहिजे. याबाबत १९ तारखेला सरकारने स्पष्ट निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या पिकांची रास्त भावात खरेदी झाली पाहिजे. स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. नैसर्गिक आपत्तीचा निधी अद्याप लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारवर दबाव टाकला जाणार आहे.
यावेळी गजबरवाडी येथील नरसिंह मंदिरात झालेल्या बैठकीस बाळासाहेब सासमिले, शिवगोंड निकम, रघुनाथ गळतगे, शिवाजी खोत, आप्पासो मोरे, धनंजय केनवडे, निवृत्ती पाटील, बाळू निकम, आप्पसो निकम, गुरुप्रसाद सासमिले आनंदा सासमिले, बाळू मोरे, रमेश गळतगे गजबरवाडी येथील बैठकीस ससंजय जोमा, अनिकेत खोत, विजय खोत, राजेंद्र खोत, मारुती नाईक, बाळासो खोत, आप्पासो दडगे, शिवानंद पाटील, प्रमोद खोत आडी येथील बैठकीस बाबासाहेब पाटील, आप्पासाहेब पाटील, सुनील गायकवाड, पांडुरंग कोळी, सुनील हरेर, दत्ता मोरे, सदाशिव मगदूम, सुनील पाटील, बाळू निपाणे, तानाजी पाटील, कृष्णा कुंभार यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
—-