निपाणी (वार्ता) : गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कोळ येथील ओम गणेश मंडळातर्फे श्री ग्रुपकडून श्री पंत मंदिरामध्ये रांगोळीच्या विविध छटा रेखाटण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या हस्ते करण्यात आले. या आकर्षक रांगोळ्या पाहण्यासाठी अक्कोळ परिसरातील नागरिकासह महिलांची गर्दी होत आहे.
गावातीलच चित्रकला प्रेमी शिक्षक व नागरिकांनी या रांगोळ्या रेखाटल्या मंडळातर्फे निरंतरपणे या रांगोळी प्रदर्शनाचेआयोजन करण्यात येत आहे. नामवंत कलाकाराकडून रेखाटलेल्या या रांगोळ्या पाहून अनेक युवक युतीने ही विविध प्रकारच्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत.
रांगोळी प्रदर्शनामध्ये सुनील पुंडे यांनी (आदिवासी महिला), राजेश पाटील (सरदार वल्लभभाई पटेल), आसिफ बेग (गौतमी पाटील), संजय साखळकर (श्री संत नामदेव, प्रकाश कदम (राधा कृष्ण), श्रेणिक व्हनशेट्टी (वज्रदंती मुलगी), प्रसाद खोडे -देवा
(कराटे पट्टू), विठ्ठल वंटे यांनी पानामध्ये श्रीकृष्णाची रांगोळी रेखाटली आहे.