Sunday , July 26 2026
Breaking News

खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात एनआयएची मोठी कारवाई; दिल्ली, उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी

Spread the love

 

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ॲक्शन मोडमध्ये असून खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स विरोधात मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एनआयएने यूपी-दिल्लीसह 5 राज्यांमध्ये 50 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या हालचालींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळां आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या हाती खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स संबंधात सुत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. यानुसार, खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स यांचा एकमेकांशी संबंध असल्याचीही मोठी धक्कादायक माहिती समोर आली असून एनआयएकडून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणाकडून मोठी कारवाई
राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधातील कारवाई वेगवाग केली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब तसेच राजस्थान या भागात 50 हून अधिक ठिकाणी छापेमारी सुरु आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक गँगस्टर्स लूपन बसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक कुख्यात गुंडांनी आश्रय घेतला असून त्यांचा संबंध खलिस्तानी दहशतवाद्यांशी असल्याचं सांगितलं जात आहे. या संबंधात तपास यंत्रणेच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात छापेमारी करण्यात येत आहे.

पाच राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी
गेल्या काही महिन्यांमध्ये देश-विदेशात खलिस्तानी कारवायांना वेग आल्याचं दिसून येत आहे. पंजाब, हरियाणा भागातही खलिस्तानी दहशतवादी ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. खलिस्तानी दहशतवादी विविध कारवायांसाठी गँगस्टर्सची मदत घेत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागली आहे. खलिस्तानी गँगस्टर्सकडून पैसे देऊन कारवाया करत आहेत. यासाठी खलिस्तानींना पैशांची गरज आहे. हा निधी पाकिस्तानातून अंमली पदार्थ तस्करी करून मिळवला जात, असल्याची माहिती आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *