Friday , October 18 2024
Breaking News

कोविडसंदर्भात महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Spread the love

 

बेळगाव : आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर पसरत असलेल्‍या कोरोना सब स्ट्रेन जेएन.१ चा संसर्ग आता कर्नाटकातही पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेत आज महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जे.एन.१ बाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

बैठकीत बोलताना महापौर शोभा सोमनाचे म्हणाल्या की, कोरोना उपप्रकार JN.1 चा संसर्ग आता सार्वजनिक क्षेत्रात पोहोचला आहे. पण त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप आदी लक्षणे आढळून आल्यास जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यासारखी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले की, महापौरांच्या अध्यक्षतेखाली आज आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची कोविडच्या नव्या स्ट्रेनबाबत महत्वाची बैठक झाली. आम्ही आमच्या जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याबाबत उपाययोजना केल्या आहेत. पुरेशा प्रमाणात बेड्सची व्यवस्था केली आहे. JN.1 स्ट्रेनबाबत फार घाबरून जाण्याची गरज नाही. कोणाला कोविडची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी जिल्हा इस्पितळासह जवळच्या आरोग्य केंद्रास भेट देण्याची विनंती केली.

यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, कर व वित्त स्थायी समिती सभापती विणा विजापुरे, आरोग्य स्थायी समिती सभापती रवी धोत्रे, सत्तारूढ पक्षनेते राजशेखर डोणी, नगरसेवक श्रीशैल कांबळे, श्रेयस नाकाडी, संदीप जिरग्याळ, हनुमंत कोंगाळी, राठोड, विठ्ठल शिंदे, जिल्हा समिती अधिकारी संजय दोडमणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे व इतर अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

म्हादई योजना १५ दिवसांत लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Spread the love  बेळगाव : कळसा भांडुरा नाला, मलप्रभा नदी जोडणी युवा संघर्ष मध्यवर्ती समिती, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *