Friday , October 18 2024
Breaking News

निपाणीत विविध ठिकाणी रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आयोध्या येथे झालेल्या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहर आणि परिसरात विविध ठिकाणी हा सोहळा पार पडला. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर -सरकार राजवाड्यात श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी विजयराजे निपाणकर सरकार, युवराज सिद्धोजीराजे सरकार, राजेश राजे सरकार शरद राजे सरकार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पंचकल्याण, रामपंथ पूजा करण्यात आली.
येथील बस स्थानकावरील निपाणी शहर रिक्षा असोसिएशन आणि वैभव रिक्षा असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रामलाल्ला सोहळा साजरा करण्यात आला. नगरसेवक संतोष सांगावकर व बाळासाहेब जासूद यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर लाडूचे वाटप झाले. यावेळी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देण्यात आला. कार्यक्रमास रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष संजय तिप्पे, उपाध्यक्ष संजय अंबुसकर, सेक्रेटरी प्रवीण पोवार, किरण हासुरे, सुनील वाडकर, अनिल वाडकर, नंदकुमार कांबळे, सुनील भिलवडे, रामा खडके, राजू पाटील, यशवंत चावरे, खंडेराव माकणे, विजय चव्हाण यांच्यासह रिक्षा असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
येथील स्मशान मारुती मंदिरात श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी देवदास कागिणकर, सुहास भगत, आकाश गाडीड्डवर, राजेंद्र भगत, सुनील अब्दागिरे, सुधीर माळवे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *