Friday , October 18 2024
Breaking News

अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात; संजय राऊतांचा खोचक टोला

Spread the love

 

मुंबई: भाजपविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरोधात ईडीचा फास आवळला जातोय. संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत आहे, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे, असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा या स्वतंत्र राहिल्या नाहीत. या भाजपचा शाखा झाल्या आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहिले त्यांच्या विरोधात यांचा वापर होतो. जे लोक भाजपच्या वॉशिंग मशीनमधे सहभागी होतात ते सुटतात, इतरांना त्रास दिला जातो. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे,असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

प्रफुल्ल पटेलांच्या जप्त केलेल्या वरळीतील बिल्डिंगमधेच ईडीचं कार्यालय : संजय राऊत
प्रफुल्ल पटेलांच्या जप्त केलेल्या वरळीतील बिल्डिंगमधेच ईडीनं कार्यालय थाटलं आहे. ज्यांच्यावर ईडीने खरंच इडीने कारवाई करायला हवी त्यांचं काय? राहुल कुल, आरोग्य खात्यातील ऍम्ब्युलन्स घोटाळा यांचं काय? ईडी सूरज चव्हाण, किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर यांना नोटिसा पाठवतं, असेही संजय राऊत म्हणाले. आजचे मुख्यमंत्री देखील याच भीतीने तिकडे गेले, त्यांच्या सोबतचे अनेक जण ईडीमुळेचे तिकडे गेले, आणखीन किती नावे आम्ही घ्यायची. आम्ही किती घोटाळे बाहेर काढले, तरी त्यांना नोटीस ईडी पाठवत नाही, पण आम्हाला पाठवते, असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्र अयोध्येतील रामाला भाजपमुक्त करेल : संजय राऊत
रोहित पवार यांच्यासोबत फक्त त्यांचा पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी आहे. सर्वात जास्त भ्रष्ट मुख्यमंत्री आसामचे आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखले, उध्दव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा दिली आहे. महाराष्ट्र अयोध्येतील रामाला भाजपमुक्त करेल, असे संजय राऊत म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..

Spread the love  ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *