Sunday , December 22 2024
Breaking News

निपाणीत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव

Spread the love

 

सकाळी वरघोडा मिरवणूक; दिवसभर श्रावक श्राविकांची गर्दी

निपाणी (वार्ता) : जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचा जन्मकल्याण सोहळा रविवारी (ता. २१) रोजी शहरासह परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी भगवान महावीर यांची प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. तसेच विविध संघटना व समाज बांधवाकडून या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.
शहरातील गुजरी पेठ येथील चंद्रप्रभू श्वेतांबर बस्तीमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. तर रात्री जन्मकल्याणक सोहळा पार पडला. यावेळी भगवान अरिहंत सागर सुरीपुरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सवा निमित्त सकाळी भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. गुरुवार पेठ, कोठीवाले कॉर्नर, जवल एजन्सी, अशोकनगर, कित्तूर चन्नम्मा चौक, रविवार पेठ मार्गे जैन मंदिरात शोभायात्रा आणि वरघोडा मिरवणूक झाली.
यावेळी अरविंद गुरुजी यांनी श्लोक सादर केले. जैन सोशल ग्रुपतर्फे साधारण भक्ती करण्यात आली. यावेळी श्रावक- श्राविकांनी भगवान महावीर यांच्या नामाचा जयघोष केला. रात्री भगवान महावीर यांच्या मूर्तीचा अभिषेक, शांतीधारा, विधान पूजा व मंगल पाळणा सादर करण्यात आला. कार्यक्रमास मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष कांतिलाल कोठडीया यांच्यासह ट्रस्टी, संघाचे सदस्य व श्रावक-श्राविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव सातबारा वरील वक्फच्या नोंदी अखेर रद्द

Spread the love  उत्तम पाटील यांच्या प्रयत्नांना यश; पूर्वीप्रमाणेच मिळणार उतारे निपाणी (वार्ता) : बोरगांव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *