Friday , November 22 2024
Breaking News

दिल्लीने लखनऊवर मिळवला विजय अन् राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये मारली धडक

Spread the love

 

रसिख दर सलामच्या अखेरच्या षटकातील शानदार गोलंदाजीसह दिल्लीने लखनऊवर १९ धावांनी विजय मिळवला. फलंदाजी करताना अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्सचे अर्धशतक आणि शाई होप, ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने २०८ धावा केल्या. या विजयासह दिल्लीने आपले प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. पण दिल्लीच्या विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २०२४ प्लेऑफमध्ये जाणारा अधिकृतपणे दुसरा संघ ठरला.

दिल्लीने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ १८९ धावाच करू शकला. आयपीएल २०२४ च्या प्राथमिक फेरीच्या अखेरच्या सामन्यात दिल्लीने घरच्या मैदानावर विजय मिळवला. यासह या हंगामातील संपूर्ण १४ सामने खेळणारा दिल्ली पहिला संघ ठरला, त्यांचे १४ सामन्यांत १४ गुण आहेत. त्यांनी अधिक २ गुण आपल्या खात्यात मिळवले आहेत. लखनऊ संघाने लवकर विकेट गमावले असले तरी संघाच्या इतर फलंदाजांनी कडवी झुंज दिली. निकोलस पुरन आणि अष्टपैलू खेळाडू अऱशद खानची वादळी खेळी पाहायला मिळाली.दिल्लीच्या या विजयामुळे लखनऊला प्लेऑफमध्ये पोहोचणे आता जवळपास अवघड झाले आहे. त्याचवेळी दिल्लीच्या सर्व आशा आता संपुष्टात आल्या आहेत. या मोसमातील शेवटचा साखळी सामना खेळण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स मैदानात उतरली होती. अशाप्रकारे, संघाला हंगामातील १४ सामन्यांत ७ विजय आणि ७ पराभवांसह केवळ १४ गुण मिळवता आले. दिल्ली अधिकृतपणे प्लेऑफमधून बाहेर नाही झाली, पण खराब रनरेटमुळे त्यांच्यासाठी प्लेऑफ गाठणे कठीण आहे. दिल्ली संघाच्या विजयासह राजस्थान रॉयल्स आता प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

दिल्लीने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊने ९ बाद १८९ धावा केल्या. लखनऊच्या डावाची सुरूवात फारच खराब झाली. केएल राहुल (५), मार्कस स्टॉयनिस (५), क्विंटन डिकॉक (१२), दिपक हुडा (०) हे लखनऊचे टॉप ४ फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर निकोलस पुरनने एकट्याने संघाचा डाव सावरला, त्याने २७ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकारांसह ६१ धावा करत बाद झाला. त्यानंतर आयुष बदोनी ६ धावा, क्रुणाल पंड्या १८ धावा करत बाद झाले. यानंतर लखनऊचा अष्टपैलू खेळाडू अरशद खानने ३३ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकार ५८ धावा करत शेवटपर्यंत लखनऊला सामन्यात टिकवून ठेवले. अरशद खानने त्याच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने जेक फ्रेझर मॅकगर्कलाहि पहिल्याच षटकात झेलबाद केले होते.

दिल्लीकडून सामनावीर ठरलेल्या इशांत शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर खलील अहमद, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्त्पूर्वी केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि त्यांनी शानदार फटकेबाजी करत २०८ धावांचा डोंगर उभारला. संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्क खातेही न उघडता लवकर बाद झाला असला तरी अभिषेक पोरेलने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांसह वादळी फलंदाजी करत ५८ धावा केल्या. त्यानंतर शाई होप (३८) आणि ऋषभ पंत (३३) यांनी विस्फोटक फलंदाजी केली. ट्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ५७ धावा करत नाबाद राहिला. तर अक्षर पटेलने १४ धावा केल्या. लखनऊकडून नवीन उल हकने २ विकेट्स घेतल्या तर अरशद खान आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी १ विकेट घेतली.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *